परतीच्या पावसाने नुकसान ; शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ ऑक्टोबर २०२२ | राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने (वय, 24 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याने पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे

खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले.

या घटनेनंतर तत्काळ गावकऱ्यांनी त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ आणि आई आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम