कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ |शासनाकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल१०० टक्के अनुदान देत आहे. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ आवळा, कागदी लिंबू व मोसंबी या फळझाडांची कलमे शेतकरी लागवड करू शकतात. त्याचबरोबर यासाठी लागणाऱ्या ठिबक सिंचनासाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येते.वैयक्तीक शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग (Bhausaheb Phundkar Orchard) योजनेचा लाभ घेता येतो. तसेच यात अनुदानाची मर्यादा ही १०० टक्के आहे. लाभार्थ्यांस एकूण ३ वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० प्रमाणे अनुदान देय होईल. पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व दुसऱ्या वर्षी फळबाग जगविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते.
माहितीनुसार, फळबाग लागवडीसाठी कलमची निवड स्वतः करावयाची असून कलमे खरेदी करतांना कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, नामांकित खासगी व कृषि विभागाच्या परवाना धारक रोपवाटीकांना प्राधान्य दिले जाईल.
योजनेअंतर्गत लाभ
1) आंबा फळबाग – अंतर ५x५, हेक्टरी झाडे ४००- अनुदान – १ लाख १ हजार ९७२ रुपये.
2) पेरू फळबाग – अंतर ३x२, हेक्टरी झाडे १६६६- अनुदान – २ लाख २ हजार ९० रुपये, अंतर ६x४, हेक्टरी झाडे-२७७, अनुदान- ६३ हजार २५३ रुपये.
3) संत्रा फळबाग – अंतर ६x३, हेक्टरी झाडे ५५५ – अनुदान – ९९ हजार ७१६ रुपये.
4) संत्रा, मोसंबी, लिंबू फळबाग – अंतर ६x६, हेक्टरी झाडे २७७- अनुदान – ६२ हजार ५७८ रुपये.
5) सीताफळ फळबाग – अंतर ५x५, हेक्टरी झाडे ४००- अनुदान – ८३ हजार ६३१ रुपये.
6) आवळा फळबाग – अंतर ७x७, हेक्टरी झाडे २००- अनुदान – ४९ हजार ७३५ रुपये.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम