आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्ट्रॉबेरीची शेती

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीची शेती फार मोठ्या प्रमाणावर सध्या केली जात आहे.जर आपण भारताचा विचार केला तर स्ट्रॉबेरीची शेती ही राजस्थानसारख्या उष्ण हवामान असलेल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जात आहे. परंतु सामान्य तापमान असलेल्या ठिकाणे पडीक जमिनीवर स्ट्रॉबेरी शेती करणे महत्त्वाचे असून यासाठी शेतकरी बांधव प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा वापर करून चांगले उत्पादन मिळवू शकतात.

अशा भागांमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर यादरम्यान स्ट्रॉबेरीचा रोपांची लागवड केली जाते व डिसेंबर ते मार्च पर्यंत स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून चांगले उत्पादन हातात यायला लागते. अशा ठिकाणी जर स्ट्रॉबेरीची लागवड करायचे असेल तर सगळ्यात आगोदर माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हव्या त्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे.स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी योग्य जातींचा विचार केला तर रानिया, मोखरा,कडलर इत्यादी जातींची लागवड भारतामध्ये केली जाते. तसेच स्वीट चार्ली आणि विंटर डाऊन यासारख्या जाती या पडीक जमिनीवर लागवड करण्यासाठी सर्वोत्तम आहेत व यापासून चांगले उत्पादन मिळवता येते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम