उडदाला ६००० ते ७८०० रूपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | देशात उडदाचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. लातूर बाजारात उडीद प्रति क्विंटल ६००० ते ७८०० रूपये दराने विकला जात आहे. तर जबलपूर मार्केटला ४००० ते ६१०० रूपये दर मिळतोय. सलग तिसऱ्या वर्षी भारतात उडदाचे उत्पादन घटणार आहे.

 

त्यामुळे यंदाही आयातीशिवाय पर्याय नाही. म्यानमारमधून उडीद मोठ्या प्रमाणावर आयात होण्याची चिन्हे आहेत. म्यानमारमध्ये यंदा उडदाचं पीक चांगलं आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीत म्यानमारमध्ये नव्या पिकाची आवक सुरू होईल. सध्या म्यानमारमध्ये नवीन पीक येईपर्यंत जुना माल कमी किंमतीत बाहेर काढण्याचा सपाटा सुरू आहे.

 

त्यामुळे म्यानमार उडदाचे दर काही प्रमाणात घटले आहेत. परंतु भारतातील उडदाचे कमी उत्पादन लक्षात घेता दीर्घ कालावधीत उडदातील तेजी कायम राहण्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम