कृषी सेवक | १७ ऑगस्ट २०२३ | देशातील काही राज्यात सफरचंदाची लागवड केली जात असते. पण गेल्या दोन महिन्यापासून देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक शेतकरीना मोठा फटका बसला आहे. अनेक पिकांचं नुकसान होत असल्यानं बळीराजा चिंतेत आहे.दरम्यान, उत्तर भारतात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. या पावसामुळं हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. त्यामुळं टोमॅटोनंतर आता सफरचंदाच्या किंमतीत देखील मोठी वाढ होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशात पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
उत्तर भारतात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठ्या प्रमाणात शेतीला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यामुळे हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळं टोमॅटोनंतर आता सफरचंद भाव खाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीच्या बाजारात सफरचंदाचा तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. हिमाचल प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं दिल्लीच्या घाऊक बाजाराच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नेहमीच पावसामुळं शेती पिकांना बसतो. यावर्षी तर खूप मोठं नुकसान झालं आहे.
सफरचंदाच्या एका बॉक्सची किंमत एक हजार रुपये असणे अपेक्षित आहे. मात्र पावसामुळं पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं एका बॉक्सची किंमत ही 2000 रुपयांवरून 3 हजार 500 रुपयांपर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शेतकरी एकाच ट्रकमध्ये फळे भरत असल्याने ही फळे लवकर सडत आहेत. त्यामुळे फळांच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून मागणीही वाढत आहे. दिल्लीतील आझादपूर मंडईतील एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, सफरचंदाचा केलेला पुरवठा संपला आहे. सध्या महामार्गावर दरड कोसळल्याने नवीन सफरचंदाचा पुरवठा होत नाही. मात्र, हिमाचल प्रदेशमधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत .
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम