कृषीसेवक | १५ नोव्हेबर २०२३
देशभरातील अनेक तरुण उद्योग क्षेत्राकडे भरारी घेत असतात पण प्रत्येक वेळी हा उद्योग उभारी घेतोच असे नाही कधी कधी आर्थिक अडचण देखील येत असते. याच उद्योगांना मोठी भरारी देण्यासाठी नेहमीच केंद्र आणि राज्य सरकार मोठी मदत करीत असतात. ज्याचा लाभ घेऊन अनेकांना फायदा होत आहे. समजा तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही पीएम मुद्रा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. सध्या सरकार ३ कोटींपर्यंतचे अनुदान देत आहे.
हे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळेल. खरंतर अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवण्यात येत आहे. बेरोजगार तरुण आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतमालावर प्रयोग करायचा आहे अशांना या योजनेचा लाभ होईल. काय आहे योजना? कसा घेता येईल लाभ? आणि किती मिळेल अनुदान? जाणून घेऊयात.
प्रगतशील शेतकरी, वैयक्तिक लाभार्थी, नवउद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी/भागिदारी, शेतकरी उत्पादक कंपनी, गैर सरकारी संस्था, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था आणि त्यांचे फेडरेशन, खासगी कंपन्यांना लाभ मिळेल.
कोरडवाहू पिके, नाशवंत फळपिके, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, मसाला पिके, गूळ आधारित उत्पादने, दुग्ध व पशू उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादनांसाठी लाभ मिळेल.
या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्याला निगडित प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख तर गट लाभार्थ्यांसाठी ३५ टक्के किंवा ३ कोटी रूपयांपर्यंतचे अनुदान मिळेल. यात राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सामावेश आहे. सर्व उद्योजकांना योजनेसाठी अर्ज करता येईल.
www.pmfme.mofpi.gov.in MIS Portal वर नोंदणी आणि अर्ज करता येईल.
जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत कार्यवाही
बँक कर्ज मंजुरी प्रक्रिया
बँकेद्वारे कर्ज वितरण
पात्र प्रकल्पांना अनुदान वाटप
जिल्हास्तरीय समितीची कार्यवाही
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम