‘या’ योजनेतून शेतकरी झाला राईस मिलचा मालक 

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १५ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक शेतकरी विविध प्रकारची शेती करीत असतात, अनेकांना या शेतीतून मोठा फायदा देखील होत असतो तर काहीना नाममात्र फायदा होत असतो. पण गेल्या काही वर्षापासून शेतकरी शेती करण्याची पद्धत बदलत आहे. आता आधुनिक पिकांना चांगला भाव मिळत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना  राबवत आहेत.

अशाच एका योजनेच्या माध्यमातून एक ट्रॅक्टर चालक राईस मिलचा मालक झाला आहे. तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील फाजुलनगर परशराम हा शेतकरीने दलित बंधू योजनेचा लाभ घेतला. योजनेमार्फत त्यांनी राईस मिलची खरेदी केली आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले.

paid add

शाळा सोडून त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजंदारी मजूर म्हणून काम केले. परशराम लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. ट्रॅक्टर चालवायला शिकून त्यांनी 2012 पासून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायला सुरुवात केली. सोबतच त्यांनी भात कापण्याच्या यंत्रावरदेखील काम केले आहे. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी गावचे सरपंच नागुला वेणुगोपाल तसेच माजी एमपीटीसी गड्डाम हनुमांडुलु यांच्या मदतीने मोबाईल राईस मिल युनिटसाठी एक अर्ज केला.

दलित बंधू अंतर्गत त्यांना युनिट मंजूर झाले. परंतु 10 लाख रुपयांच्या युनिट खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळं त्यांनी अतिरिक्त मदतीसाठी जिल्हाधिकारी अनुराग जयंती यांच्याशी संपर्क केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना युनियन बँक ऑफ इंडियामधीन दोन लाख 50 हजार रुपयांचे कर्ज मिळवून दिले. तसेच उरलेले 1.50 लाख रुपये उभे करून त्यांनी युनिटची खरेदी केले. एक क्विंटल तांदूळ मिलिंगसाठी 300 रुपये आकारण्यात येतात. यातून ते दररोज 1 हजार 800 रुपये कमवत आहेत. एका दिवसासाठी डिझेलसाठी 500 रुपये सोडून त्यांना 1 हजार 300 रुपयांचा नफा मिळतो. ऑफ सिझनमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने बिगर शेतीची कामेही करतात. असे मिळून ते दरमहा 10,000 रुपये कमावत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम