लक्झरी कारमध्ये शेतकरी विकू लागला भाजीपाला

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३० सप्टेंबर २०२३

देशभर कोरोनाचे थैमान सुरु असतांना अनेकांची नोकरी व कामे बंद झाल्यावर अनेकांनी भाजी विक्रीस सुरुवात केली होती. त्यात अनेक लोक आपल्या दुचाकीवर व चारचाकीमध्ये देखील भाजीपाला विक्री करीत असल्याच्या नेहमीच बातमी समोर आली असतांना आज देखील एक शेतकरी लक्झरी कारमध्ये बसून बाजारात आपले उत्पादन विकायला जात आहे. तूम्हाला हे खरे वाटत नसेल तर केरळच्या एक शेतकऱ्याची कहानी तुम्ही वाचायला हवीच.

paid add

या शेतकऱ्याने मेहनतीच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. केरळचा हा शेतकरी साध्यासुध्या नव्हे तर चक्क ऑडी ए 4 मध्ये बसून बाजारात भाजी विकायला जात आहे. शेतीचा व्यवसाय तसा बिनभरोशाचा म्हटला जातो. शेती करणे हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार मानला जातो. केरळच्या या ऑडीवाल्या शेतकऱ्याचे नाव सुजीत आहे. तो देखील आधुनिक शेतकऱ्यांच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्याने शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे.

आज तो यशस्वी शेतकरी बनला असून अनेक शेतकऱ्यांचा आदर्श बनला आहे. लोक त्याला रस्त्याच्याकडेला ऑडी कार उभी करून भाजी विकताना पहातात तर आश्चर्यचकीत होऊन जातात. एका शेतकऱ्यांच्या या प्रगतीने सारे स्तंभीत झाले आहेत. सुजीत त्याच्या विभागात खूप लोकप्रिय आहे. सोशल मिडीयावर त्याचे अकाऊंट आहे. तो शेतीची माहीती शेअर करीत असतो. त्याच्याकडून अनेक जण प्रेरणा घेऊन जैविक शेती शिकत आहेत. इस्टाग्रामवर सुजीत शेअर केलेल्या व्हिडीओत ऑडी कारमधून उतरतो. बाजारात पथारी पसरत त्यावर पालेभाज्या विकताना दिसत आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम