शेतकऱ्याला लाखोंचा फटका : नेट शेडमधील मिरचीची झाडे कापली !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३० सप्टेंबर २०२३

राज्यातील अनेक शेतकरी संकटात असतांना दुसरीकडं सरकारच्या धोरणांचा देखील राज्यातील बळीराजाला फटका बसतोय. अशातच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान केल्याच्या घटना देखील घडत आहे.

paid add

एक अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा इथं घडलीय. शेतकरी सतीश भोसले यांच्या शेतातील नेट शेडमधील मिरचीची झाडे अज्ञाताने कापून टाकली आहेत. याचा मोठा फटका सतीश भोसले यांना बसला असून, त्याचं तब्बल पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतकरी सतीश भोसले यांच्या शेतात त्यांनी मिरचीचे बियाणे घेण्यासाठी इस्ट वेस्ट कंपनीची 535 झाडे लावली होती. ही झाडे दोन महिन्यापूर्वी लागवड करण्यात आली होती. मात्र, काल (29 सप्टेंबर) रात्री अज्ञात व्यक्तीने नेट शेडमधील 535 झाडे कापून टाकली आहेत. यामुळं या शेतकऱ्याचं अंदाजे पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. सतीश भोसले यांनी याप्रकरणी कृषी विभागाकडं तक्रार करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम