कृषीसेवक | १५ नोव्हेबर २०२३
जगभरात २०१९ मध्ये कोरोनाचे मोठे संकट आल्यावर अनेक मोठ्या कंपनीमधून तरुणांना राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे देशभर बेरोजगारीचे मोठे सावट आले असतांना अनेक तरुणांनी शेतीकडे वळत आधुनिक शेतीसह पशुपालन देखील करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा काम करणारे तरुण आज कोट्यावधीची उलाढाल करीत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या गाई आणि म्हशींचे पालन करावे लागेल.
सध्या नोकरी मिळणे आणि ती टिकवणे अवघड बनले आहे. परंतु एका उच्च शिक्षित तरुणाने लाखो रुपये पगार असणारी नोकरी सोडली आहे. नोकरी सोडून त्याने पशुपालनाचा निर्णय घेतला. आज त्याची सहा कोटींमध्ये उलाढाल आहे. गाझियाबाद येथील असीम रावत असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी अमेरिकेसह अनेक देशांत काम केले असून ते सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्यांना पगार देखील चांगला होता. परंतु, एकदा त्यांनी टीव्ही चॅनलवर गायींच्या संदर्भात चर्चा ऐकली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून पशुपालन करण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये नोकरी सोडून त्याच वर्षी त्यांनी दोन गायींसह व्यवसाय सुरू केला. आज त्यांची व्यवसायाची उलाढाल 6 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यांना म्हैस पालन आणि परदेशी गायी पाळायच्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी देशी गाई पाळण्याचा निर्णय घेतला.
कारण या गाईच्या दुधात अनेक जीवनसत्वे आढळते. त्यांचे इतरही फायदे आहेत. देशी गाईचे फक्त दूधच नाही तर खत आणि गोमूत्रासाठीदेखील चांगल्या मानल्या जातात. त्यांच्या देखभालीसाठी जास्त खर्च येत नाही. त्यांच्याकडे गिर, साहिवाल, हिमालयीन बद्री देशी गायी आहेत. गाझियाबाद आणि बुलंदशहरमध्येही आपली डेअरी सुरु केली आहे. ते सेंद्रिय शेती देखील करतात. शिवाय त्यांनी त्यांच्या डेअरीमध्ये 85 लोकांना रोजगार दिला असून ते आपली अनेक उत्पादने विकतात. त्यांना थेट ऑर्डर मिळतात आणि ते आपल्या वेबसाइटवर उत्पादन विकतात. त्यांची सर्व उत्पादने ई-कॉमर्स वेबसाइटवर मिळतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी गायींची स्वच्छता आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली आहे. बैल आणि वासरांचीदेखील देखभाल केली जाते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम