कृषीसेवक | १६ नोव्हेबर २०२३
अनेक शेतकरी विविध प्रकारची शेती करून मोठे उत्पन्न घेत असतात, यासोबत देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून अनुदान देखील जाहीर करत असते. आता सरकारकडून प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान देण्यात येत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अनुदान मिळेल.
3 महिन्यांसाठी भाजीपाला लागवडीसाठी आणि बहुवार्षिक फळबागांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान मिळेल. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहनदेखील कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
प्लास्टिक मल्चिंग पेपरचा हेक्टरी खर्च बत्तीस हजार असतो. त्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. यानुसार जास्तीत जास्त हेक्टरी 16 हजार रुपये अनुदान मिळेल.
शिवाय डोंगराळ भागांत प्रतिहेक्टरअनुदानाचे प्रमाण हे 36 हजार आठशे रुपये मापदंडानुसार असते. खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 18 हजार चारशे रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन एकरसाठी अनुदान मिळते.
शेतकरी,बचत गट, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था यांना योजनेचा लाभ घेता येतो.
काय लागणार कागदपत्र ?
आधार लिंक असणाऱ्या बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स
आधार कार्डची झेरॉक्स कॉपी
जमिनीचा सातबारा उतारा
आठ अ चा उतारा
योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी तुम्ही संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीम यावर अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती देऊन आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरावा लागणार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम