कृषीसेवक | ४ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देवून अनेक नवनवीन प्रयोग करत आहे. आधुनक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेत आहेत. एका अशाच इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यानं वांग्याच्या शेतातून आर्थिक प्रगती साधली आहे. फक्त दहा गुंठे वांग्याच्या शेतातून शेतकरी लखपती झाला आहे. अविनाश कळंत्रे असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे.
इंदापूर तालुक्यातील तावशी येथील शेतकरी अविनाश कळंत्रे यांना 20 गुंठे जमीन आहे. यामधील फक्त दहा गुंठ्यावर केलेल्या वांग्याच्या पिकातून अविनाथ कळंत्रे लखपती झाले आहेत. कळंत्रे यांनी दहा गुंठे जमिनीवरती अजित 111 या वाणाच्या वांग्याची लागवड केली. वांग्याच्या दोन बेडमधील अंतर आठ फूट तर दोन झाडातील अंतर हे अडीच फूट ठेवले आहे. गेली दहा महिने झालं त्यांच्या वांग्याचं उत्पादन सुरु आहे. त्यातून त्यांना जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. आतापर्यंत त्यांना 20 टन उत्पन्न मिळालं आहे. तर अजून एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पादन कळंत्रे यांना अपेक्षित आहे.
शेतकरी अविनाश कळंत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत वांग्याला त्यांचा एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च झाला आहे. इस्राइल पद्धतीनं त्यांना वांग्याची शेती करायची होती. परंतू नियोजनात फसगत झाल्यानं वांग्याचे पीक हे तब्बल 10 ते 12 फुटापर्यंत वाढलं. या आधी ऊसाची लागवड करीत होते. पंरतू त्यातून त्यांना काही हजारांचे उत्पादन मिळत होते. पण वांग्याची लागवड केली आणि कळंत्रे यांना चांगले दिवस आले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम