वातावरणीय बदलामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ४ ऑक्टोबर २०२३

देशभरात गेल्या काही महिन्या आधी टोमॅटोच्या दरामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमाविले होता पण त्याच टोमॅटोची आज लाली संपली आहे. सध्या भंडारा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळं शेतकरी अन्य पिकांचे उत्पादन घेत असल्याचं चित्र दिसत आहे. वातावरण बदल आणि योग्य दर मिळत नसल्यानं टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळं शेतकरी चिंतेत असून टोमॅटोचं उत्पादन न घेण्याचा निर्णय घेत आहेत.

paid add

भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील जांब परिसरात एकेकाळी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं होतं. मात्र, मागील काही वर्षात वातावरणातील बदल आणि टोमॅटोला बाजार मिळत नसल्यानं योग्य दराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी ज्या शेतीती टोमॅटोचं भरघोस उत्पादन घेतलं जातं असे ते शेतकरी आता आर्थिक विवंचनेत अडकलेत. त्यामुळं हे शेतकरी आता टोमॅटोऐवजी अन्य पिकांची शेती करण्याकडे वळल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन करणारे शेतकरी आहेत. भात पिकाला पर्याय म्हणून अनेकांनी नगदी पीक म्हणून पालेभाजी पिकाला महत्त्व दिलं. यात मोहाडी तालुक्यातील जांब, लोहारा, बीकेखेरी, देऊळगाव आणि आसपासच्या सुमारे 25 पेक्षा अधिक गावात भात पिकासह टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. सुमारे 400 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील शेतात टोमॅटोचं उत्पादन घेतलं जात होतं. मात्र, मागील काही वर्षांपासून वातावरण मोठ्या प्रमाणात बदल घडत असून वेगवेगळ्या प्रकाराच्या रोगांचाही प्रादुर्भाव यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, दुसरीकडं उत्पादन निघाल्यावर बाजारात ते विक्रीसाठी नेल्यावर त्याला योग्य दर मिळत नाही. यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी, यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी आता अन्य पिकांकडं वळला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम