आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्थगित

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३० नोव्हेंबर २०२२ I राज्यात सद्य:स्थितीत ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सुरू असलेला सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम व ७ हजार १४७ सहकारी संस्थांचा निवडणूकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणूका या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाने २९ नोव्हेंबरला आदेश पारित केला. राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर च्या आदेशान्वये १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम