कृषी सेवक | २३ नोव्हेंबर २०२२ | मान्सूनची अनियमितता व पावसाच्या घटत्या प्रमाणामुळे शेतीसाठी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवत असते, अशा परिस्थितीत ठिबक सिंचनचा अवलंब अत्यंत महत्वाचा आहे.
ठिबक सिंचनाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :
ठिबकने द्रवरूप खत देता येऊन शंभर टक्के खताचा वापर होतो.
खताच्या खर्चामध्ये 30-35 % बचत होते.
पिकांना समप्रमाणात खते देता येतात.
पिके लवकर काढणीला येऊन दुबार पिकाला फायद्याचे ठरते
पाण्याची 30 ते 80% बचत होते.
वाचलेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी वापर करता येतो.
क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिल्यास पिकांचे उत्पादन घेता येते.
पाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसल्याने मजुरी खर्चात बचत होते.
उत्पादनात 20 ते 200 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.
ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते.
चढ उतार असणाऱ्या जमिनी ह्या सपाट ठेवता त्या ठिबकने लागवडीखाली आणता येतात.
कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन घेता येते.
ठिबक सिंचनाचा वापर केल्याने जमिनीची धूप थांबते.
पाणी साठून राहत नाही.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम