मालदांडी ज्वारीला ५ हजारांचा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | सध्या धान्य बाजार तेजीत आहे. यामुळे बाजारभावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता इंदापूर येथे भुसार शेतमाल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीतमालदांडी ज्वारीला ५००१ रुपये दर मिळाला आहे.

तसेच बाजरीला ३३६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. इंदापूर व भिगवण उपबाजारात या सप्ताहात एकूण १७ हजार पिशव्यांची भुसार शेतीमालाची आवक झाली. या परिसरात देखील कडधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते.

यामध्ये ज्वारीच्या ३४ पोती, बाजरीच्या ३६३ पोत्यांची आवक झाली. तर मका १४,२५० पोत्यांची आवक झाली. यामध्ये मक्याला २२०० रुपये, गव्हाला ३२०० रुपये क्विंटल दर इंदापूर व भिगवण बाजारात मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment