सोयाबीनचे ६ नवे वान ; रोगावर राहणार प्रतिरोधक !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ४ फेब्रुवारी २०२३।  सध्या देशात सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामात देखील सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशात सोयाबीन उत्पादकांसाठी चांगली बातमी आहे. कारण नव्या ६ वनांचे संशोधन करण्यात आले आहे.

इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या पार पडलेल्या ५२ व्या वार्षिक बैठकीत उत्तरी पर्वतीय, उत्तरी मैदानी तसेच मध्य क्षेत्राकरीता सोयाबीनच्या नव्या सहा वाणांची शिफारस करण्यात आली. त्यामध्ये अधिक उत्पादनक्षम तसेच येलो मोझॅक प्रतिकारक वाणाचा देखील समावेश असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.तेलबियावर्गीय सोयाबीन पिकाचे केंद्रबिंदू असलेल्या मध्य प्रदेशातील मालवा परिसरात ही बैठक पार पडली.देशभरातील सुमारे १५० सोयाबीन संशोधक व तज्ज्ञांची या बैठकीला उपस्थिती होती.

-उत्तरी पर्वतीय क्षेत्राकरीता वीएलएस-९९, उत्तरी मैदानी क्षेत्राकरिता एनआरसी १४९ तसेच मध्य क्षेत्राकरिता चार वाणांचा समावेश आहे.
– मध्य क्षेत्राकरिता असलेल्या वाणांमध्ये एनआरसी-१५२, एनआरसी-१५०, जेएस-२१-७२ तसेच हिम्सो-१६८९ हे वाण असल्याची माहिती देण्यात आली.\
-एनआरसी-१४९ हे वाण येलो मोझॅक, राइजोक्‍टोनिया एरियल ब्लाइट सोबत गर्डल बीटल व पर्णभक्षी किडींना प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
– एनआरसी-१५० हे वाण अवघ्या ९१ दिवसांत परिपक्‍व होते.
-सोयाबीनमध्ये (Soyabean) विशिष्ट गंध येतो, हे वाण असा गंध येण्यासाठी जबाबदार असलेल्या लाइपोक्‍सीजिनेज-२ एंजाईम मुक्‍त असल्याचे सांगण्यात आले.
-एनआरसी-१५२ हे वाण ९० दिवसांपेक्षा कमी कालावधीत परिपक्‍व होते, असा दावा संस्थेने केला आहे.
-खाद्यान्न म्हणून उपयुक्‍त आणि अपौष्टिक क्‍लुनिटस, ट्रिप्सिंग इनहिबिटर आणि लाइपोक्‍सीजनेस एसिड-२ पासून देखील हे वाण मुक्‍त असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ जबलपूरद्वारा एक सोयाबीन वाण विकसित करण्यात आले असून हे वाण येलो मोझॅक, चारकोल रोट, बॅक्‍टेरियल पस्ट्यूल तसेच लीफ स्पॉट रोगांना प्रतिकारक असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी सोयाबीन संशोधन व विकास क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डॉ. सुनील दत्त बिलोरे, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणेचे डॉ. फिलिप वर्गिस, आनंद कृषी महाविद्यालय गुजरातचे डॉ. जी. जे. पटेल, सीहोर कृषी महाविद्यालयाचे डॉ. रामगिरी यांना सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा
#soyabin
Comments (0)
Add Comment