साखरेच्या एमएसपीत वाढ होण्याची दाट शक्यता!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १ मे २०२४ । केंद्र सरकारकडून देशातील साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारला सहकारी साखर कारखान्यांकडून साखर आणि इथेनॉल उत्पादनाची महाराष्ट्रात आणि प्रदेशनिहाय वास्तविक किंमत काय आहे आणि त्याची गणना करण्याचे काम राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांच्या महासंघावर सोपवण्यात आले आहे. एनएफसीएसएफने देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापकांना आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राज्य संघटनांना पत्र लिहून साखर व इथेनॉलच्या उत्पादन खर्चाचा तपशील पाठविण्यास सांगितले आहे.

दुग्धव्यवसायाला मिळेल गती; ‘या’ यंत्राद्वारे होईल दूध काढणीचे काम सोपे..!

एनएफसीएसएफने पत्रात असे म्हटले कि, पत्र मिळाल्यानंतर एक आठवड्याच्या आत माहिती पाठवावी. साखर उद्योगातून केंद्र सरकारला साखरेचा एमएसपी (Sugar MSP) वाढवून, प्रचलित उसाच्या एफआरपीशी सुसंगत करण्याची मागणी होत आहे. यामुळे साखर कारखान्यांचा महसूल वाढेल आणि त्यांची तरलता स्थिती सुधारेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर उसाची बिले देण्यास मदत होणार आहे.

अशातच लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्रातील साखर उद्योगाकडून कारखान्यांना विविध कारणांनी बँकांच्या कर्जाची गरज आहे. त्यासोबतच अनेक मुद्यांवर अनेक कारखानदारांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. यात प्रामुख्याने इथेनॉल बंदी, साखर निर्यात बंदी, साखरेची किमान विक्री किंमत, कारखान्यांवर झालेली कारवाई अशा अनेक कारणांबाबत कारखानदारांनी फडणीवस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

शेवग्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनतात ‘ही’ उत्पादने!

त्यामुळे अशातच आता देशातील साखरेची किमान विक्री किंमत वाढ केली जाण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांच्या महासंघाने देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापकांना आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राज्य संघटनांना पत्र लिहीत माहिती मागवल्याने साखरेच्या एमएसपीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment