कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | राज्यासह देशातील अनेक भंगांमधील पाऊस थांबला असला तरी काहीराज्यात पावसाने उघडीप घेतलेली नाही मात्र आता काहीसा पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाचा फटका इतर पिकांसह कापसालाही बसला आहे.

त्यामुळे सध्या शासनाकडून नुकसानीची पाहणी सुरु असून यात कापसाचे किती नुकसान झाले हे आकडेवारीतून समजणार आहे. दरम्यान शेतकऱयांनी कापसाचे उत्पादन पावसामुळे घातल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र प्रक्रिया उद्योगांना उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आठवडाभरात कापसाला ७ हजार ते ९ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाले असल्याने शेतकरी समाधानी आहे.मात्र उद्योगांकडून मागणी वाढल्यानंतर शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपयांचा भाव मिळण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment