कांद्याला सरासरी १ हजार २०० ते १ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ६ जानेवारी २०२३ । देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक वाढली. त्यामुळं महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये दर नरमलेले आहेत. राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये कांद्याची आवक जास्त आहे.

त्यामुळं कांद्याला सरासरी १ हजार २०० ते १ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

मागील एक महिन्यापासून कांद्याचे दर दबावात आले आहेत. मात्र आठवडाभरापासून दरात काहीशी वाढ दिसून आली.

बाजारातील कांदा आवक मर्यादीत झाल्यानंतर कांदा दर सुधारु शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment