कपाशीच्या दरातील वाढ कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३ जानेवारी २०२३ । देशातील बाजारात कापसाचे नरमलेले दर मागील चार दिवसांपासून सुधारत आहेत.

 

आजही देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत वाढले होते. आज देशात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

 

राज्यातही यादरम्यान भाव होता. शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी आपल्या अपेक्षित दरपातळीवर टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केल्यास फादेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment