बैलांपासून होणार वीजनिर्मिती !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १९ जानेवारी २०२३ ।  देशातील शेतकरीचा खरा मित्र मानला जाणारा बैला हा नेहमी शेतकरीच्या सर्वच कामात येत असतो त्यामुळे शेतीसाठी नेहमी बैल हा महत्वाचा मानला जात आहे. शेतीमधील कामासाठी, मशागतीसाठी वापर केला जात आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत यांत्रिकरणामुळे बैलांची जागा ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आदींनी घेतली. गाई, म्हैस यांना दुधासाठी अनेक शेतकरी पाळतात. मात्र बैल, रेडा यांना पाळण्याचा खर्च अधिक असल्याने अलीकडे बैलांचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शैर्यतींच्या उद्देशानेही अनेकजण बैल पाळतात. मात्र आता बैलांपासून वीजनिर्मिती करता येते अन त्यातून चांगले पैसेही कमवता येतात असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल.

बैल, रेडा यांना अनेकजण रस्त्यावर मोकळे सोडून देतात. रोजचा वैरणीचा खर्च पेलत नसल्याने अन त्यांचा शेतातही काही उपयोग होत नसल्यानं मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. परिणामी गो शाळांवर त्याचा ताण पडत आहे. आता या अशा मोकाट जनावरांपासून वीजनिर्मिती करून त्या गाईंचे मूल्य वाढवून त्याच्यातून उत्पन्नही मिळवणे शक्य होणार आहे.

लखनौपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोसाईगंज येथील सिद्धुपुरवाया गावात बैलांपासून वीजनिर्मिती केली जात आहे. येथे गोठ्यात बैलांना ट्रेडमिलवर चालवून वीजनिर्मिती केली जात आहे. या संकल्पनेला नंदी रथ असे नाव देण्यात आले आहे. या नंदी रथावर बैलांचा नैवेद्य दाखविला जातो. सोबतच चाऱ्याचीही व्यवस्था केली आहे. हे बैल चारा खातात आणि ट्रेडमिलवर चालतात. ट्रेडमिल गियर बॉक्सशी जोडली गेली आहे. यातून 1500 RPM पॉवर तयार होत आहे.
सिद्धपुरा गावातील या गोशाळेचे मालक असलेल्या माजी डीएसपी शैलेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. आम्ही इथे 1500 RPM वर वीज तयार करत आहोत. आतापर्यंत संपूर्ण जगात केवळ 500 ते 700 RPM वीज तयार केली गेली आहे. मात्र आमच्या गोशाळेत बसवण्यात आलेल्या गिअरबॉक्सने अधिक वीज निर्माण करण्याचा विक्रम केला आहे. या मॉडेलचे पेटंटहि घेण्यात आले आहे.

नंदी रथच्या माध्यमातून बैलांपासून वीज बनवण्याच्या संकल्पनेवर काम करून तुम्ही दरमहा 4,000 ते 5,000 रुपये कमवू शकता. ही कमाई फक्त विजेपासून होईल. याशिवाय बैलांपासून मिळणाऱ्या शेणापासून गांडूळ खत, सेंद्रिय खत इत्यादी बनवूनही चांगली कमाई करता येते. आजकाल पर्यावरण रक्षणासाठी सेंद्रिय शेती आणि हरित ऊर्जेकडे कल वाढत आहे. अशा परिस्थितीत ही संकल्पनाही सौरऊर्जेप्रमाणे हरित ऊर्जेचे उत्तम उदाहरण ठरू शकते. सौरऊर्जेने केवळ वायू प्रदूषण दूर केले जात असले तरी 25 वर्षांनंतर सौरऊर्जा प्रकल्पाच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे प्रदूषण सुद्धा वाढेल, तर बैलांपासून वीज निर्मितीच्या संकल्पनेत पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाही.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment