तुकडा आणि बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी हटवली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १ डिसेंबर २०२२ I केंद्र सरकारने तुकडा तांदूळ आणि सेंद्रिय बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. देशात तांदळाची उपलब्धतावाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

केंद्र सरकारने सप्टेंबरच्या सुरूवातीला तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतरही किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमती वाढू लागल्यानंतर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावलं होतं. आता तांदळाची उपलब्धता वाढली असून दरही नरमले आहेत.

 

त्यामुळे निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंसंबंधीची अधिसूचना काढली आहे. या निर्णयामुळे तांदळाच्या किंमतीला आधार मिळेल, असे बाजार तज्ञांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment