काकडीच्या शेतीतून शेतकरीने कमविला बक्कळ पैसा !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २९ जानेवारी २०२३ ।  देशातील असे अनेक शेतकरी आहेत जे शेतीतून बक्कळ पैसा कमवीत असतात, पण कधीही ते शेतीला दोष देत बसत नाही आपली यशस्वी घोडदौड त्यांनी सातत्याने एकाच विषयात काम करीत ते यशस्वी झालेले असतात, अशाच एका शेतकरीने कमी कालावधीत बक्कळ पैसा शेतीतून कमविला आहे. औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याने घेत तब्बल 29 गुंठ्यात 3 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवलं आहे.

आज कमी पाण्यात आणि कमी पैशात शेतकऱ्यांकडून नवीन सुधारित आणि प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर शेतीत केला जाऊ लागला आहे. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथील शेतकरी बंडू नारायण पडूळ यांनी देखील शासकीय योजनेचा लाभ घेत प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काकडी लागवडीतून चांगली कमाई केली आहे. बंडू पडूळ यांनी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देण्यासाठी शेडनेट हाऊसमध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थातच पोखरा योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेतला. या अनुदानातून त्यांनी आपल्या 40 गुंठे शेत जमिनीत शेडनेटची उभारणी केली. त्याच्या जोडीला त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सोलर पंप योजनेचा लाभ घेतला आहे.

पडूळ यांनी आपल्या चाळीस गुंठे शेत जमिनीत उभारलेल्या शेडनेट हाऊस मध्ये वीस गुंठ्यात काकडीची आणि वीस गुंठ्यात शिमला मिरचीची लागवड केली आहे. त्यांच्या काकडीला सध्या स्थितीत 28 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. असा दर जर कायम राहिला तर खर्च वजा जाता त्यांना तीन लाखांपर्यंत नफा केवळ काकडीतून मिळणार आहे. म्हणजेच अर्धा एकर शेत जमिनीतून तीन लाखांची त्यांना कमाई होणार आहे. शेतकरी बंडू पडूळ यांनी आपल्या शेतीतीतून इतरांनाही रोजगार दिला आहे. शेडनेट हाऊसची उभारणी करण्यासाठी महिलांची व शेतकऱ्यांची गरज भासते. त्यांनी आपल्या शेतात दहा ते बारा महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनाचा प्रश्न वारंवार उमटत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना आपणि देता येत नाही. मात्र हुशार शेतकरी बंडू पडूळ यांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी सोलार पंप बसवला. त्यांनी पंपाद्वारे पाणी दिले. महाराष्ट्र शासनाच्या सोलार पंप योजने अंतर्गत बंडू पडूळ यांना 3 किलोवॅटचा पंप ज्याची बाजारात किंमत तीन ते साडेतीन लाख रुपये आहे. तो अवघ्या 16 हजारांत त्यांनी घेतला.

बातमी शेअर करा
#aurngabad
Comments (0)
Add Comment