शेतकरी चिंतेत : राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २५ नोव्हेबर  २०२३

राज्यातील अनेक शेतकरी यंदा कमी पाऊस पडल्याने चिंतेत आहे मात्र आता हवामान विभागाचा आलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसासह गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तसेच कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपीट पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांतही पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त करण्यात आला आहे हवामान विभागाने राज्यात येत्या ३-४ दिवसांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

बातमी शेअर करा
#Weather
Comments (0)
Add Comment