गांजा शेती उध्वस्थ ; शिरपूर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | १२ रोजी दुपारी शिरपूर तालुक्यातील चिलारे गावात टिटवापाणी पाडा शिवारात छापा टाकत पोलिसांनी गांजा शेती उध्वस्थ केली. झाडांसह सुकविण्यासाठी टाकलेला 2 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.

गांज्या अंमली पदार्थ वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती काल शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह दुपारी एक वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला.

शेती हिरालाल व्यंकट पावरा (वय. ५२ रा.चिलारे टिटवापाणी पाडा) हा कसत असलेल्या निष्पन्न झाले. शेतात ५ ते ६ फुटापर्यंतची गांजाची झाडे दिसून आली. एकूण ७४ हजार रुपये किमतीची ३७ किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे व शेतात सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेला १ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा २६ किलो ८०० ग्रॅम वजनाचा ओला गांजा असा एकूण २ लाख ८ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी हिरालाल पावरा विरुध्द शिरपूर तालूका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई भिकाजी पाटील यांच्याकडे आहे..

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागिय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई भिकाजी पाटील, पोसई संदीप पाटील, पोहेकॉ संजय सुर्यवंशी, पोना संदीप ठाकरे, परशुराम पवार, पोकॉ मुकेश पावरा, कृष्णा पावरा, संजय भोई, योगेश मोरे, सईद रज्जाक शेख, रोहिदास पावरा यांनी कारवाई केली आहे.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment