पशुपालकांसाठी महत्वाची बातमी : गाय-म्हशींसाठी  ‘वंधत्व निवारण अभियान’

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २६ नोव्हेबर २०२३

दूध उत्पादनासाठी गायी – म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे व भाकड जनावरांचे वंधत्व निवारण करून माजावर आणण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये “राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान ” राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. शिबिरांमध्ये गायी-म्हशींची तपासणी करून वंधत्वाचे निदान करून उपचार करण्यात येणार आहे. जनावरांचे अपेक्षित शारिरीक वजन वाढ व पशु प्रजनाचा थेट संबध असल्याने शारीरीक वजन घट असलेल्या जनावरांमध्ये वंधत्वाची शक्यता दाट असते.अशा जनावरांची तपासणी करून योग्य पशुआहार देण्यासंबधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच खनिज मिश्रणे पुरविणत येणर आहेत. जनावरामध्ये गोचिड, गोमाशा, जंत प्रार्दुभाव असल्यास शारीरीक वजन घट दिसून येते. शिबिरामध्ये जंत, गोचिड व गोमाशा निर्मूलनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये गायी-म्हशींचे प्रजनन, माजाचे चक्र, माजाचे लक्षणे, मुकामाज इ. बाबत मार्गदर्शन करून योग्य माजाच्या काळात कृत्रिम रेतना संबधी मार्गदर्शन करण्यात येईल.

शिबिरामध्ये सर्व गायी-म्हशींची तज्ज्ञ टीमद्वारे तपासणी करण्यात येवून योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत. सर्व पशुपालकांनी या वंधत्व निवारण अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
#Important News for Cattle Breeders
Comments (0)
Add Comment