कडकनाथ कोंबडी पालनासाठी मध्यप्रदेश सरकारची योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | गेल्या काही वर्षात शहरी भागात कडकनाथ कोंबडीची मागणी वाढत आहे. कडकनाथ कोंबडीचे मांस आणि अंडी इतर कोंबड्या आणि अंड्यांपेक्षा जास्त महाग आहे. एक अंडे सुमारे ३० रुपयांना तर चिकन ९०० ते ११०० रुपये किलोने मिळते. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकार कडकनाथ कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कडकनाथ कोंबडीची वाढती मागणी लक्षात घेऊन आदिवासी महिलांसाठी कडकनाथ संगोपन युनिट उभारण्यासाठी मदत करत आहे. ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मध्य प्रदेश सरकार सुमारे एक लाख रुपये खर्च करून कडकनाथ कुक्कुटपालनासाठी लाभार्थ्यांना शेड बांधकाम, भांडी, धान्य, १०० पिल्ले व तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देत आहे. लसीकरणानंतर ही २८ दिवसांची पिल्ले लाभार्थ्यांना दिली जात आहेत. यामुळे त्यांचा मृत्युदर कमी होतो आणि नुकसान कमी होते. कडकनाथ कोंबड्यांची विक्री झाली नाही तर पशुसंवर्धन विभागामार्फत अंडी आणि कोंबड्यांची खरेदी केली जाईल. ज्यामुळे लाभार्थ्याचे कोणतेही नुकसान होत नाही. .

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment