बुलढाणा जिल्ह्यात साडेसहाशे शेतकऱ्यांची ज्वारी ,मका विक्रीसाठी नोंदणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | बुलढाणा जिल्ह्यात या हंगामातील मका, ज्वारी, बाजरी खरेदीला येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार असून मका १९६२ रुपये, ज्वारी २९९० (मालदांडी) आणि ज्वारी २९७० (संकरित) दराने खऱेदी केली जाईल. या केंद्रावर हा शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे सुरू केले असून साडेसहाशे शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य शासनातर्फे हमीदरात मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी नोंदणी सुरू असून १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

.यंदा पहिल्यांदाच नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संस्थेत स्वत: हजर राहून छायाचित्र काढणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या हंगामाचा सात-बारा उतारा, पिकपेरा, स्पष्ट खाते क्रमांक दिसणारे बँक पासबुकची झेरॉक्स (जनधन पासबुक देण्यात येऊ नये), आधारकार्ड ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment