नांदेड जिल्ह्यात सव्वा तीन लाख शेतकऱ्यांची पेरा नोंदणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ | राज्यात ई-पीक पाहणी मोहिमेंतर्गत रब्बीतील पिकांचा पेरा नोंदणी सध्या सुरु आहे. सोमवारपर्यंत नांदेड जिल्ह्यात तीन लाख २१ हजार ४८३ खातेदार शेतकऱ्यांनी तीन लाख ८४ हजार ५०८ हेक्टरसाठी पेरा नोंदणी केली आहे.

पेरा नोंदणीसाठी चार दिवस शिल्लक आहेत. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. राज्यात मागीलवर्षी खरीप हंगामापासून महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment