खरिपातील मक्याची आवक सुरु

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ११ डिसेंबर २०२२ I देशात सध्या खरिपातील मक्याची आवक सुरु आहे. मात्र निर्यातही वेगाने होत असल्यामुळे देशातील बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा २०० ते २५० रुपयांनी जास्त आहेत.

 

नेमकं याचं मोठं भांडवल करत पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाने मका निर्यातबंदी करण्याची मागणी केली. सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमी आहे. मात्र याचा काहीसा मानसिक परिणाम बाजारावर जाणवला. सध्या मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार १५० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. पुढील काळात मक्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment