बाजारात तुरीची आवक वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २६ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात सध्या तुरीची आवक काहीशी वाढत आहे. मात्र दुसरीकडे पुढील काळात आयातीची गती कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुरीचे दर टिकून आहेत.

 

तर काही बाजारांमध्ये तुरीच्या दरात किंचित सुधारणाही पाहायला मिळाली. सध्या देशातील बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तुरीचे दर या पातळीवर टिकतील, तसेच या दराववर तुरीला आधार मिळेल, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment