मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे आत्महत्या

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ ||संततधार पावसामुळे मराठवाडय़ात सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झाले असून या अस्मानी नुकसानी सोबत सुलतानी संकटाला जायचे या विवंचनेतून बीडच्या आष्टी तालुक्यातील पांढरी आणि नांदेड जिल्हय़ाच्या नायगाव बाजार तालुक्यातील नरंगल या गावांतील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब बाबुराव वांढरे (५६) यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती असून अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. चिंतेत असलेल्या दादासाहेब वांढरे यांनी आज रविवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने बीड जिल्हा हादरला .

दुसऱया घटनेत नांदेड जिह्यातील नायगाव बाजार तालुक्यातील नरंगल येथील युवा शेतकरी प्रदीप मुपुंद पट्टेकर (30) हे सततची नापिकी व महागाईमुळे त्रस्त होते. प्रदीप यांनी काल शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment