गांडूळ खत निर्मिती उद्योग; महिलेची वर्षाला ५० लाखांची कमाई!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ एप्रिल २०२४ | या महिलेने गांडूळ खत निर्मिती उद्योगामध्ये भक्कमपणे पाय रोवले आहे. गेल्या चार वर्षांपासून या महिला उद्योगाच्या माध्यमातून वार्षिक ५० लाखांची कमाई करत आहे.

ऋचा दीक्षित असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. त्या उत्तरप्रदेशातील शाहजहांपुर येथील रहिवासी आहेत. ऋचा दीक्षित यांनी पुणे येथील एका नामांकित कृषी विषयक कंपनीत काम केले. परंतु, नोकरीत मन रमत नव्हते. अशातच कोरोनाकाळात त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनतर त्या गावी परतल्या. आणि प्रदीर्घ विचारांती त्या २०२१ साली गांडूळ खत निर्मिती उद्योगात उतरल्या. तत्पूर्वी त्यांनी यु-ट्यूबच्या माध्यमातून या व्यवसायातील सर्व बारकाई समजून घेतले.

ऋचा दीक्षित हे सांगतात की, सुरुवातीला त्यांनी केवळ ६० हजार रुपये इतक्या कमी गुंतवणुकीत छोटेखानी गांडूळ खत निर्मिती उद्योग सुरु केला. यावेळी त्यांनी शेड उभारले. १५ ट्रॉली शेणखत विकत घेतले. गांडूळ बीज मागवले. त्यानंतर त्यांनी आपल्या परिसरातील नर्सरी उद्योगक आणि शेतकऱ्यांमध्ये आपल्या गांडूळ खताची मार्केटिंग करून, त्यांना विक्री सुरु केली. गांडूळ खत विक्रीसाठी त्यांनी १ किलो – ७० रुपये, २ किलो – १२० रुपये, ५ किलो – १९९ रुपये, १० किलो – २९९ रुपये असे पॅकेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय त्यांनी आपल्या गांडूळ खताचा ब्रँड सर्व ऑनलाइन प्लेटफॉर्म देखील उपलब्ध करून दिला आहे. ज्या माध्यमातून त्या घरपोच शेतकऱ्यांना गांढूळ खत पाठवतात.

ऋचा दीक्षित सांगतात की, गेल्या ३ ते ४ वर्षांमध्ये त्यांनी गांढूळ खत निर्मिती उद्योगात चांगली पकड मजबूत केली. आपल्याकडे दररोज गांडूळ खतासाठी जवळपास ५०० ते ६०० लोक ऑर्डर आहे. मागणीचा हाच आकडा ऐन पावसाळ्याच्या हंगामामध्ये एक हजारापर्यंत देखील जाऊन पोहचतो. याशिवाय परिसरातील काही शेतकरी थेट आपल्या प्लांटवर येऊन गांडूळ खताची खरेदी देखील करतात.

 

बातमी शेअर करा
#agribusiness#agriculture#GandulKhatBusiness#latestagribusiness
Comments (0)
Add Comment