यंदा शिल्लक उसाची समस्या भेडसावणार नाही – साखर आयुक्त

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३० नोव्हेंबर २०२२ I यंदा उसाचा गळित हंगाम उशिरा सुरू झालेला असला तरी शिल्लक उसाची समस्या भेडसावणार नाही. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ४५ मोठ्या साखर कारखान्यांनी विस्तारीकरण केलेले आहे. त्यामुळे राज्याची दैनंदिन गाळप क्षमता ६० हजार टनाने वाढलेली आहे. त्यामुळे यंदा गाळप हंगाम जूनपर्यंत चालणार नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच यंदा खोडवा उसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या वजनामध्ये २० टक्क्यांपर्यंत तर मराठवाड्यात ३० टक्क्यांपर्यंत घट येते आहे. परिणामी महिनाभर आधीच यंदाचा गाळप हंगाम समाप्त होऊ शकतो. त्यामुळे शिल्लक उसाची समस्या उद्भवणार नाही, असे साखर आयुक्तांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment