अर्जेंटीना ठरला ब्राझीलच्या सोयाबीनचा दुसरा मोठा खरेदीदार

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २३ जून २०२३ । जागतिक पातळीवर सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत अर्जेंटीना आघाडीवर असतो. पण यंदा अर्जेंटीनातील उत्पादन दुष्कामुळे निम्यावर आले. यामुळे अर्जेंटीनावर सोयाबीन आयात वाढविण्याची वेळ आली.

यंदा ब्राझीलच्या सोयाबीनचा दोन नंबरचा खरेदीदार अर्जेंटीना ठरला आहे. अर्जेंटीनाला आणखी सोयाबीन आयात करावी लागेल, असे निर्यतादार संस्थांनी सांगितले.

जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात अर्जेंटीना तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझील मागील सहा वर्षांपासून अमेरिकेला मागे टाकून शिखरावर आहे. अर्जेंटीना सोयाबीन उत्पादनासह निर्यातीतही तिसऱ्या क्रमांकावर असतो. पण यंदा अर्जेंटीनात भीषण दुष्काळ पडला होता. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला.

येथील सोयाबीन उत्पादन ऐतिहासिक पातळीवर कमी झाले. हंगामाच्या सुरुवातील लागवडीची गती पाहून अर्जेंटीना ४२० लाख टन सोयाबीन उत्पादन घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण नंतर दुष्काळ पडला आणि उत्पादनाचे अंदाज कमी होत गेले. ताज्या अंदाजानुसार अर्जेंटीनाचे उत्पादन २०० लाख टनांवर स्थिरावेल आहे.

अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटल्याने आयात करावी लागणार आहे. तशी आयात अर्जेंटीनाने सुरु केली. देशाची गरज पूर्ण करण्यासाठी अर्जेंटीनाला किमान १०० लाख टनांची आयात करावी लागेल, असा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला होता.

पण आता अर्जेंटीनाची आयात ९० लाख टनांवरच स्थिरावेल, असे दिसते. पण यंदा ब्राझीलच्या सोयाबीनचा दोन नंबरचा ग्राहक अर्जेंटीना ठरला. ब्राझीलमधून अर्जेंटीनाला होणारी निर्यात यंदा वाढली.

पाच महिन्यांतील आयात

ब्राझीलने जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात अर्जेंटीनाला १९ लाख २० टन सोयाबीन निर्यात केली. केवळ मे महिन्यातच जवलपास १० लाख टन सोयाबीन अर्जेंटीनाने ब्राझीलमधून आयात केले. अजून ब्राझीलमधून अर्जेंटीनाला २० किंवा ३० लाख टन सोयाबीन निर्यात होऊ शकते, अशा अंदाज ब्राझीलमधील संस्थांनी व्यक्त केला.

मे महिन्यातील आयात

मे महिन्याचा विचार करता अर्जेंटीनाने एकूण १३ लाख ६० हजार टन सोयाबीन आयात केले. मागीलवर्षी म्हणजेच २०२२ च्या मे महिन्यातील आयात केवळ ५ लाख टन होती. अर्जेंटीनाने मे महिन्यात जवळपास ३५ लाख टन सोयाबीनचे गाळप केले.

तर सोयातेलाचे उत्पादन ७ लाख टनांवर पोचले. तसेच मे महिन्यातील सोयापेंड उत्पादन २६ लाख टनांवर होते. अर्जेंटीनातून सोयातेल आणि सोयापेंड निर्यातही सुरु आहे. तेसच अर्जेंटीना नवं पीक येईपर्यंत आणखी आयात करेल, असे निर्यातदार संस्थांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम