कापूस लागवड पिछाडीवर; महाराष्ट्रात किती हेक्टरवर झाली लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २३ जून २०२३ । देशातील बाजारात कापसाचे भाव दबावात असताना दुसरीकडे कापूस लागवड पिछाडीवर आहे. आतापर्यंत केवळ उत्तर भारतातील लागवडीची गेती अधिक दिसते. तर मध्य भारत आणि दक्षिण भारतातील लागवड पिछाडीवर आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कापूस लागवडीची गती १४ टक्क्यांनी धिमी असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पेरणी अहवालातून स्पष्ट होते.

जून महिन्यातील पावसाचाा विचार करता आतापर्यंत वेगवेगळ्या कापूस उत्पादक भागात ७० ते ८० टक्के कमी पाऊस झाला. बहुतांशी भागांमध्ये तर पावसाने दर्शनही दिले नाही. तर पेरणीयोग्य पावसाची वाट सर्वच भागातील शेतकरी पाहत आहेत.

यामुळे यंदा खरिपातील पेरणी पिछाडीवर आहे. देशात आजपर्यंत, म्हणजेच २३ जून पर्यंत २८ लाख हेक्टवर कापसाची लागवड झाली. गेल्या हंगामात याच काळातील कापूस लागवड जवळपास ३३ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा १४ टक्क्यांनी लागवड पिछाडीवर आहे.

विभागनिहाय कापूस लागवडीची गती पाहता उत्तर भारतातील लागवड काहीशी अधिक दिसते. यंदा राजस्थानमधील लागवड २७ टक्क्यांनी अधिक आहे. तर पंजाब आणि हरियानातील लागवड कमी आहे.

पंजाबमध्ये आतापर्यंत कापूस लागवड ३२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. मागील हंगामात २ लाख ५० हजार हेक्टरवर झालेली लागवड सध्या १ लाख ७ हजार हेक्टरवर स्थिरावलेली दिसते. तर राजस्थानमधील लागवड गेल्यावर्षीच्या ५ लाख हेक्टरवरून यंदा जवळपास ७ लाख हेक्टरवर पोचली. यामुळे उत्तर भारतातील कापूस लागवड वाढलेली दिसते.

paid add

मध्य भारतातील लागवडीचा विचार करता, गुजरात आणि मध्य प्रदेशातील लागवडीची गती जास्त दिसते. तर महाराष्ट्रातील लागवड ७१ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गुजरातमधील लागवड १७ टक्क्यांनी अधिक राहून जवळपास ७ लाख हेक्टरवर पोचली.

तर मध्य प्रदेशातील लागवड ८५ टक्क्यांनी वाढून ३ लाख हेक्टरवर पोचली. दक्षिण भारतातील लागवडीचा विचार करता केवळ तमिळनाडूत लागवड अधिक दिसते. तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमधील लागवड पिछाडीवर आहे.

महाराष्ट्रातील लागवड ७१ टक्क्यांनी पिछाडीवर

कापूस लागवड क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असते. राज्यात पूर्वहंगामी लागवड काही भागात होते. सिंचनाची व्यवस्था असलेल्या भागात पूर्वहंगामाी लागवडींना प्राधान्य दिले जाते. पण राज्यातील मोठे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

यंदा माॅन्सून अद्यापही संपूर्ण राज्यात व्यापला नाही. पेरणीयोग्य पाऊस कोणत्यातच भागात झाला नाही. त्यामुळे कापूस लागवड ७१ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. मागील हंगामात २३ जून २०२२ पर्यंत राज्यात साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. पण यंदा याच तारखेपर्यंत केवळ १ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होऊ शकली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम