सध्या कापसाला अपेक्षेपेक्षा कमी दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ | देशात स्थानिक बाजारात सध्या कापसाला कमी दर मिळत आहेत. सध्या देशातून कापड निर्यात घटली आहे. परिणामी सूतिगरण्यांकडून कापसाला कमी उठाव मिळत आहे. त्यामुळे दर सध्या दबावात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या देशात कापसाला किमान ७ हजार ५०० रुपये तर कमाल ९ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. . बाजारात कापसाची मागणी वाढल्यानंतर दर सुधारतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी ९ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायदेशीर ठरेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम