नवी मुंबईत १६ ते१८ फेब्रुवारी दरम्यान जागतिक मसाला संमेलन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ |मसाला क्षेत्रातील सर्वात मोठे १४ वे जागतिक मसाला संमेलन १६ ते१८ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र येथे भरणार आहे. हे संमेलन भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या स्पाइसेस बोर्ड तर्फे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात 50 पेक्षा जास्त देशांतील एक हजाराहून जास्त प्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. स्पाइसेस बोर्ड इंडियाच्या वतीने आयोजित केले जाणारे हे द्वैवार्षिक संमेलन जगभरातील मसाला उद्योगांना एकत्र येऊन या क्षेत्रातील समस्या आणि अपेक्षा याविषयी चर्चा करण्यासाठीचे प्रमुख व्यासपीठ आहे.या संमेलनात व्यावसायिक सत्रांव्यतिरिक्त भारतीय मसाला उद्योगातील उत्पादने , औषधी/आरोग्य क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अशी मसाल्याची उत्पादने यांचे सुद्धा प्रदर्शन असते. अधिक माहितीसाठी www.worldspicecongress.com या संकेतस्थळाला भेट द्या

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम