पेरुला सरासरी प्रतिक्विंटल २ ते ४ हजार भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I राज्यात मागील काही वर्षांपासून पेरुची लागवड वाढली. मात्र पेरुवर प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळं थेट खाण्यासाठीच पेरुचा वापर होतो. पण वाढलेल्या उत्पादनाला मागणी कमी राहत असल्यानं पेरु उत्पादक अडचणीत आले आहेत.

सध्या पेरुला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळतोय. पुढे उन्हाचा चटका वाढल्यानंतर पेरुच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज पेरू व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम