निवडणुकीपूर्वी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठ गिफ्ट !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १७ नोव्हेबर २०२३

आगामी काळात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे तर राज्यात देखील मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला जनता कौल देते हे देखील तितकेच महत्वाचे आहे. अशातच निवडणुकांपूर्वी भाजप सरकार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. नुकताच या योजनेचा 15 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. झारखंडमधील जाहीर कार्यक्रमात हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. शेतकरी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.

paid add

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा आणि 17 वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. इतकेच नाही तर या हप्त्याच्या रकमेत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जर हप्त्याच्या रकमेत वाढ झाली तर शेतकऱ्यांच्या खात्यात दुप्पट पैसे येऊ शकतात. शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा हप्ता मिळू शकतो.

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील त्यावेळी या योजनेंतर्गत तीन हप्त्यांमध्ये वार्षिक दिले जाणारे 6000 रुपये 8,000 ते 9,000 रुपये केले जातील. दरम्यान, या योजनेअंतर्गत 15 व्या हप्त्यादरम्यान 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल 18,000 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2.80 लाख कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नव्हती, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम