लाल कांदाला मिळाला साडे चार हजारांचा भाव !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १७ नोव्हेबर २०२३

राज्यभरातील लाखो कांदा उत्पादक गेल्या काही महिन्यापासून चिंतेत असतांना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीच्या विंचूर येथील उपबाजार आवारात दाखल लाल कांद्यास लिलावाच्या पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल चार हजार ५०० रुपयांचा विक्रमी भाव मिळाला.

paid add

लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख १५ बाजार समित्या आणि दोन खासगी बाजार समित्यांमध्ये कांदा, तसेच धान्याचे लिलाव ७ नोव्हेंबरपासून बंद आहेत. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराच्या आवारात दीपावली पाडव्यापासून लाल कांद्याच्या लिलावास प्रारंभ झाला. सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक पंढरीनाथ थोरे यांच्या हस्ते लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी येवला तालुक्यातील ठाणगाव पिंपरी येथे योगेश्वर ठोंबरे यांच्या नवीन लाल कांद्याला उच्चांकी भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला कमाल चार हजार किमान दोन हजार १०० व सरासरी तीन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दीपावली पाडव्यानिमित्त विंचूर उपबाजार आवारात बाजार समितीने चहापान फराळ कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, पंढरीनाथ थोरे, रमेश पालवे, आबा बोरगुडे, महेश पठाडे, सरपंच दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे, अशोक गायकवाड, प्रकाश कुमावत, पंकज होळकर उपस्थित होते. सुनील डाचके यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम