कृषीसेवक | २१ सप्टेंबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत देशात टोमॅटोचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत होते, त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशाच्या विविध भागात टोमॅटोच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.
यामुळे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली असली तरी आता मात्र यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सरकारने उचललेल्या पावलांमुळे 250 रुपये किलोपर्यंत विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचा भाव आता अनेक ठिकाणी 3 ते 10 रुपये किलो झाला आहे. याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दिसून आला आहे.
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान टोमॅटोचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे. अशा स्थितीत सप्टेंबर 2023 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 9.56 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. तर ऑक्टोबरमध्ये ते 13 लाख टन अपेक्षित आहे. अशा स्थितीत जास्त उत्पादन झाल्यास टोमॅटोचे भाव आणखी कमी होऊ शकतात. उद्यान विभागाने ग्राहक आणि अन्न व्यवहार विभागाशी याबाबत चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विभाग विविध राज्यांमधून 10 ते 20 कोटी रुपयांचे टोमॅटो खरेदी करू शकतो. टोमॅटोच्या घसरलेल्या किमतींबद्दल महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम