उसाच्या पिकावर आता होणार ड्रोनद्वारे फवारणी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २१ सप्टेंबर २०२३

राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षापासून अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. त्याचा मोठा फायदा देखील होत आहे. त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड-पहासू साबितगढच्या माध्यमातून करीरा गावात ड्रोनद्वारे उसाच्या पिकावर कीटकनाशक फवारणी करण्यात आली.

paid add

पहासू साबितगढच्या त्रिवेणी ऊस कंपनीच्या तसेच ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रदीप त्यागी यांच्या शेतात ड्रोनच्या माध्यमातून गरजेनुसार पाण्याचा वापर करत किटकनाशकांची फवारणी केली. उसावर ही फवारणी करण्यात आली. ड्रोनच्या फवारणीसाठी प्रती एकर १०० रुपये खर्च येतो, असे सांगण्यात आले. ड्रोनमुळे फवारणीत मनुष्यबळासह किटकनाशकाचीही बचत होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.साबितगढ साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक दिनेश कुमार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सध्या उसाच्या ०२३८ प्रजातीवर रोगाचा फैलाव गतीने होत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी कारखान्याच्यावतीने सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर औषध फवारणीसाठी मदत केली जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम