तूर दरात मोठी वाढ; १२ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ एप्रिल २०२४ | तुरीच्या दरवाढीने आता चांगलाच जोर धरला आहे. तुरीचे दर १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. मागील १० ते १२ दिवसांमध्ये तुरीने हा दरवाढीचा टप्पा गाठला आहे. सामान्यपणे मार्च महिन्याच्या अखेरीस कमाल १०४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत असलेले तूर दर आता सध्या कमाल १२००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जावून पोहचले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीला सध्या कमाल ११००५ ते किमान ९८९५ रुपये तर सरासरी ११३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.

 

शनिवारी दि. ६ एप्रिल २०२४ वर्धा जिल्ह्यातील सिंदी बाजार समितीत कमाल ११८०० ते किमान ९५५० रुपये तर सरासरी १०००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर बाजार समितीत कमाल ११७०० ते किमान १०५०० रुपये तर सरासरी १११५० रुपये प्रति क्विंटल, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा बाजार समितीत कमाल ११७५० ते किमान १०५०० रुपये तर सरासरी ११३०० रुपये प्रति क्विंटल, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीत कमाल ११६०५ ते किमान ९५०० रुपये तर सरासरी ११२०० रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी बाजार समितीत कमाल ११४०० ते किमान १०७०० रुपये तर सरासरी ११०५० रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील आर्वी बाजार समितीत कमाल ११३४० ते किमान ९००० रुपये तर सरासरी १०००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

 

‘या’ मार्केटमध्ये 11 हजाराहून अधिक दर

 

paid add

याशिवाय सध्या मुरुम (धाराशिव), अकोला, अमरावती, चिखली (अमरावती), नागपूर, पाचोरा (जळगाव), सावनेर (नागपूर), तेल्हारा (अकोला), उमरगा (धाराशिव), नेर परसोपंत (यवतमाळ), दुधणी (सोलापूर), उमरेड (नागपूर) या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीला ११ हजार रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे.

 

सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक घटली आहे. विशेष म्हणजे उन्हाळयाच्या दिवसांमध्ये बऱ्याच गृहिणी या वर्षभराची तुरीच्या डाळींसह अन्य डाळींची तजवीज करून ठेवतात. यामुळे या कालावधीत त्या-त्या डाळवर्गीय पिकांना मागणी असते. अशातच सध्या हंगामही शेवटाला आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम