कृषी सेवक | ७ एप्रिल २०२४ | आता तुम्ही देखील डेअरी व्यवसाय करण्याच्या विचारात असाल. परंतु, मुऱ्हा किंवा जाफराबादी यातील नेमकी कोणती म्हैस निवडावी? याबाबत तुमच्या मनात शंका असेल. तर ही पोस्ट तुमच्या सा. आज आपण या पोस्टच्या माध्यमातून मुऱ्हा म्हैस आणि जाफराबादी म्हैस यातील नेमक्या कोणत्या म्हशीची डेअरी व्यवसायासाठी निवड करावी. हे जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये म्हशींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करताना प्रामुख्याने मुऱ्हा आणि जाफराबादी म्हैस या दोन प्रजातींच्या म्हशींना शेतकऱ्यांची पहिली पसंती असते. यातील मुऱ्हा ही म्हैस मूळची हरियाणा राज्यातील आहे. तर जाफराबादी ही म्हैस मूळची गुजरातच्या सौराष्ट्र भागातील आहे. सदर म्हशी वरचढ असून, शेतकऱ्यांना पालनातून मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे डेअरी व्यवसाय सुरु करण्याआधी शेतकऱ्यांना या दोन्ही म्हशींच्या वैशिष्ट्यांबाबत बाबतीत सविस्तरपणे माहिती असणे आवश्यक आहे.
मुऱ्हा म्हैस ही जगातील सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशींपैकी एक आहे. मुऱ्हा प्रजातीच्या म्हशी संपूर्ण देशभरात आढळतात. परंतु, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या भागात त्या सर्वाधिक आढळतात. या जातीच्या म्हशींची शिंगे ही जिलेबी सारख्या वळलेली असतात. या जातीच्या म्हशीचा रंग पूर्णपणे काळा असतो. मुऱ्हा म्हशीचे डोके छोटे आणि शेपूट मोठी असते. मुऱ्हा म्हैस दररोज २० ते ३० लीटर दूध देण्यास सक्षम असते.
जाफराबादी म्हशीचा रंग साधारणपणे काळा असतो. परंतु, ती राखाडी रंगात देखील पाहायला मिळते. या म्हशीच्या शरीराचा आकार हा अन्य जातीच्या म्हशींच्या आकारापेक्षा मोठा असतो. जाफराबादी म्हशीची शिंगे लांब आणि वळलेली असतात. याशिवाय या जातीच्या म्हशीचे कान लांब, पायाचे खूर काळे, डोके आणि मानेचा आकार मोठा असतो. जाफराबादी म्हशीच्या कपाळावर पांढरे निशान पाहायला मिळतात. त्यामुळे या निशाणांमुळे या जातीच्या म्हशीची ओळख होते.
डोके मोठे असले तरी या जातीच्या म्हशीचे तोंड छोटे असते. तर त्वचा मुलायम असते. जाफराबादी म्हैस देखील दररोज २० ते ३० लीटर दूध देते. आपल्या एका वेताला ही म्हैस १८०० ते २००० लीटर इतके दूध देते.
या जातीच्या म्हशीचे वजन ७५० ते १००० किलोग्रॅम असते.
आता तुम्हाला निश्चितच प्रश्न पडला असेल की नेमकी कोणती म्हैस निवडावी. तर दोन्ही म्हशी या दूध देण्याच्या बाबतीत वरचढ आहे. दोन्ही जातीच्या म्हशी दररोज २० ते ३० लीटर दूध देण्यास सक्षम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही एका जातीच्या म्हशींची निवड करून आपला दूध व्यवसाय करू शकतात. दोन्ही जातीच्या म्हशी व्यवस्थितपणे चारा, पाणी याची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना नक्कीच अधिकचे दूध उत्पादन मिळेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम