बैलपोळ्याचा सण ; बाजार पेठ रंगीबेरंगी साहित्यांनी फुलला !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १३ सप्टेंबर २०२३

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह , विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो.

paid add

शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला सण म्हणजे बैलपोळा. हा बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर आला आहे. गुरुवारी म्हणजे 14 सप्टेंबरला बैलपोळा साजरा होणार आहे. या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलले आहेत. हिंगोलीच्या बाजारपेठेत देखील विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे.

बैलपोळा सणासाठी रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा, त्याचबरोबर झुले, विविध प्रकारचे कंडे, गोंडे, चंगाळी, बैलाच्या शिंगाना देण्यासाठी विविध प्रकारचे कलरतसेच इतर सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होताना दिसत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विविध प्रकारे सजविले जाते. गळ्यात चंगाळे (घंटा) बांधल्या जातात. सुती धाग्यात विणलेल्या चंगाळ्यांवर लोकरी गोंडे गुंफलेले असतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम