‘या’ शेतकऱ्याचे डाळिंब थेट बांगलादेशी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १३ सप्टेंबर २०२३

राज्यातील एक शेतकरी चक्क डाळिंबाच्या पंधराशे झाडावर जवळपास 40 ते 50 टन डाळिंबाचे उत्पन्न घेवून हे डाळिंब बांगलादेशी पाठवत आहे. त्यामुळे हा शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न कमवू लागला आहे. माळशिरस तालुक्यातील जांभूळ गावातील अण्णा पाटील हा शेती व्यवसाय करीत आहे.

पंधराशे झाडाच्या डाळिंबातून जवळपास एक कोटींच्यावरती उत्पन्न मिळणार असल्याचे अण्णा पाटील जांभुळ यांनी सांगितले आहे. 3 हजार झाडाच्या देखभालीसाठी वर्षभरात साडेचार लाख रुपये खर्च करून बाग सांभाळली. उत्तम नियोजन करून देखभाल करून कमी फवारणीत कमी खर्चात बागेची देखभाल केल्याने उत्पन्नही चांगले मिळाल्याचे अण्णा पाटील यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसाठी येणाऱ्या दिवसात दिलासादायक स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे नवीन कांद्याची लागवड सुरू आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पुढच्या चार दिवसात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे पुढच्या अडीच तेथील महिन्यात चांगल्या दर्जाचा कांदा बाजारात येईल. त्याची चांगली किंमत शेतकऱ्यांना मिळेल असा अंदाज सध्या नाशिकच्या बाजारांमध्ये वर्तवला जातो आहे.

शेतक-यांचा जनआक्रोश मोर्चा जलसंपदा कार्यालयावर धडकला आहे. निळवंडे धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. संगमनेर येथील जलसंपदा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. 182 गावात वर्षानुवर्ष दुष्काळ आहे. दुष्काळी भागासाठी बनवण्यात आलेल्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम