कापसाचे दर वाढणार : या भावापार्यात येण्याची शक्यता !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २२ जानेवारी २०२३ ।  चीनमध्ये कोरोनाचा कहर कमी झाला नाही. यामुळे केंद्र सरकारने चीनमध्ये कापसाची निर्यात करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर गडगडले होते. पण आता देशातील कापूस शेतकरीला मोठा दिलासा मिळाला आहे तर येत्या काही दिवसात कापसाचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

शेतकरी आणि बाजारभाव यांच गणित नेहमी जुळत नसतं. शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा दर पडलेले असतात. शेतकऱ्यांचा शेतमाल विकला गेला असताना बाजारात दर वाढलेले असतात. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत असतो. आता कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलंय. पांढरे सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस यंदा भाव खातोय. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येण्यापुर्वी दहा हजार क्विंटलचा दर कापसाचा होता.आता हा दर सात हजारांवर आला होता. परंतु त्यात आता सुधारणा होत आहे. कापसाचे दर ८ हजार ८६० रुपयांवर गेले आहे. दर १० हजारांवर जाणार का? दोन-तीन आठवड्यांपासून कापसाचे दर वाढत नव्हते. यामुळे शेतकरी आपला माल विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये आणत नव्हता. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पर्यायाने कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मागील वर्षी १२ हजारांपर्यंत कापसाचे दर होते. यंदा ते सात ते आठ हजारांवर आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, तण काढणी व कापूस वेचणीसाठी मोठा खर्च करावा लागतो. परंतु त्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. परंतु आता दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता कापसाचा दर ८ हजार ८०० रुपयांवर गेला आहे. येत्या आठवड्यात हा दर नऊ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये १३ ते १४ हजार रूपयांपर्यंत कापसाला भाव होता. तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा कापूस विकला गेला होता. त्यामुळे दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना झाला. शेतकऱ्यांना दरात चढ-उतार होत असल्यानं यंदा फेब्रवारीत दहा हजारांचा टप्पा तरी कापूस पार करेल का याबाबत शंका वाटत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम