शेतकऱ्यांच्या खात्यावरून रक्कम गायब ; अधिकारी निलंबित !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २२ जानेवारी २०२३ ।  राज्यातील शेतकरीच्या पिकाला आधीच कमी भाव मिळत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, त्याचसोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलल्याप्रकरणी शाखा अधिकाऱ्यासह रोखपाल आणि तपासणीसाला निलंबित करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील डीसीसी बँकेतून 12 शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार पुढे आला होता. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचे गांभीर्य पाहून तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील डीसीसी बँकेतून 12 शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलण्यात आले होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार केली. या तक्रारीनंतर बँकेचे शाखा अधिकारी, लेखपाल आणि तपासणीस या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळाला होता. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. 12 शेतकऱ्यांच्या खात्यावरून प्रत्येकी 50 हजार रुपये या कर्मचाऱ्यांनी संगणमत करून परस्पर उचलले होते. याच प्रकरणी बीडच्या जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर या तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेचे खातेदार शिवाजी प्रल्हाद कवडे, लक्ष्मण प्रल्हाद कवडे, बाळु दगडु पवार, वृंदावणी बाबासाहेब कदम, सुरेश बारीकराव कवडे यांच्या खात्यातून महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत खात्यावर 50 हजार रूपये जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेज आले होते. परंतु यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान अज्ञात व्यक्तिने उचलल्याचे उघडकीस आले. याविषयी बॅकेत विचारणा केल्यावर मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दिली. याबरोबरच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यामुळे अखेर बँकेच्या तीन अधिकाऱ्यावर निलंबाची कारवाई करण्यात आली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम